Sujay Vikhe Patil Balasaheb Thorat  Saam tv
महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : पोराबाळांनीच तुमचा पराभव केला; सुजय विखेंचे बाळासाहेब थोरातांना प्रतिउत्तर

Shirdi News : राहुल गांधीना न्याय व्यवस्थेवर, निवडणुक आयोग, मतदारांवर विश्वास नाही. राहुल गांधींना 20 वर्षापूर्वीही नाकारत होते. 10 वर्षापूर्वीही नाकारलय आणि आताही नाकारत आहेत. त्यामुळे बदल काहीच दिसत नाही.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : थोरात साहेब, आम्हाला पोरबाळं म्हणण्याची चूक तुम्ही केली आणि पोराबाळांनीच तुमचा पराभव केला. सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो हे त्यांना पचत नाही आम्ही ४० वर्षे संघर्षच करत आलोय आणि भविष्यात जी परिस्थिती येईल ती हाताळायला आम्ही समर्थ आहोत; असे प्रतिउत्तर सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिले आहे. 

शिर्डी मतदारसंघातील लोणी येथे एका कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांनी बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला होता. मला पोराबाळांवर बोलायला लावू नका. पोराबाळांना सांगा काळ खूप मोठा आहे. काळजीपूर्वक जा; असा टोला बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना लगावला होता. त्यावर माननीय थोरात साहेब, पोराबाळांनीच तुमचा पराभव केला असे प्रतिउत्तर सुजय विखे यांनी दिले आहे.

तेव्हा आम्ही पोरबाळं नव्हतो का?
थोरात पोराबाळांवर बोलत नाहीत, तर विधानसभेला प्रत्येक भाषणात माझ्याबद्दल का बोलले? अमोल खताळला खबऱ्या का म्हणाले? सुजय विखे काट्या कुपट्यातून पळाले, असं का म्हणाले? तेंव्हा आम्ही पोरबाळं नव्हतो आणि तुमचा पराभव झाल्यावर आम्ही पोरबाळं झालो का? असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला आहे. 

नैराश्येतून बोगस मतदानाचे वक्तव्य 
निवडणुकीपूर्वी मतदार याद्या उपलब्ध असतात. अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी हरकती घ्यायला संधी असते. राहुल गांधी यांच्या आमदारांनी यादी पब्लिश होण्याआधी आक्षेप का घेतला नाही? निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितल्यावर मागे सरकले. हा फक्त फुसका बॉम्ब असून फक्त आरोप प्रत्यारोप आहेत. जनतेने निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारले. या नैराश्यातून बोगस मतदानाचे वक्तव्य केले जात आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकित जनता सोबत  
आम्ही लोकांना जे शब्द दिले होते, ते प्रश्न सोडवण्याची सुरुवात झाली आहे. संगमनेरातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची रणनिती आम्ही मिडियासमोर सांगणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता आमच्याबरोबर राहील याचा आम्हाला विश्वास असून जनता आजही त्यांच्याबरोबर नाही. जे लोक त्यांच्या मीटिंगला जातात आणि तेच लोक आम्हाला सांगतात, काळजी करू नका आम्हाला जाव लागतं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT