Shirdi Saibaba Mandir Saam tv
महाराष्ट्र

Saibaba Mandir: साई समाधी मंदिर कळसाला सुवर्ण वज्रलेप; भाविकाच्या देणगीतून झाले काम

Shirdi News : साई समाधी मंदिर कळसाला सुवर्ण वज्रलेप; भाविकाच्या देणगीतून झाले काम

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीच्या साईबाबा मंदिराला मोठ्या प्रमाणात देणगी येत असते. रोख रकमेसह (Shirdi) दागिने देखील दान म्हणून दिले जातात. अशाच एका भाविकाकडून देण्यात आलेल्या देणगीतुन साई समाधी मंदिराच्या कळसाच्या आतील बाजूने सुवर्ण मुलामा लावण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

देणगीदार साईभक्‍त बी. विजयकुमार यांनी सन-२००७ मध्‍ये समाधी मंदीरावरील कळस व त्‍याभोवताली असलेले चार गोपुर यांनाही सुवर्ण मुलामा देण्‍याचे काम देणगी स्‍वरुपात केलेले आहे. यावर आता पुन्‍हा (Saibaba Temple) एक थर सुवर्ण वज्रलेप करण्‍याचे कामही करण्‍यात आले आहे. यासाठी नेमका खर्च किती आला याबाबत गुप्तता पाळण्यात आली असून देणगीदार साईभक्‍तांच्‍या विनंतीवरुन देणगी मुल्‍य नमुद केलेले नाही. 

संस्थांनतर्फे देणगीदाराचा सत्कार 

देणगीदार साईभक्‍त श्री. बी. विजयकुमार व  सौ. सी. वनजा हैद्राबाद यांचे देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदीराच्‍या कळसाचे आतील बाजुस सुवर्ण वज्रलेपाचे (मुलामा ) काम पुर्ण झाल्याने साईबाबा संस्‍थानच्‍या (Saibaba Sansthan) वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी त्‍यांचा श्री साईबाबांची मुर्ती व विभुती देऊन सत्‍कार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

SCROLL FOR NEXT