Priyanka Gandhi Saam tv
महाराष्ट्र

Priyanka Gandhi : गाडीचे सारथ्य करणाऱ्या तरुणासाठी प्रियंका गांधी विमानतळावर थांबल्या; फोटो काढला अन् झाल्या मार्गस्थ

Shirdi News : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आज शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य प्रकाश खांबकर या तरुणाने केले. प्रियंका गांधी यांच्यासाठी या तरुणाची गाडी बुक करण्यात आली होती.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहिल्यानगर)
: काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची शिर्डी मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. सभा संपवून शिर्डी विमानतळावर पोहचल्यानंतर गाडीचे सारथ्य करणाऱ्या तरुणासोबत फोटो काढण्यासाठी प्रियंका गांधी काही काळ शिर्डी विमानतळावर थांबल्याचे बघायला मिळाले. कहा गया वो..अशी विचारणा करत त्या तरुणाला बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत फोटो काढल्यानंतर गांधी पुढील सभेसाठी रवाना झाल्या.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य प्रकाश खांबकर या तरुणाने केले. प्रियंका गांधी यांच्यासाठी या तरुणाची गाडी बुक करण्यात आली होती. प्रियंका गांधी या शिर्डी विमानतळावर पोहचल्यानंतर साई मंदिर त्यानंतर सभा आणि पुन्हा शिर्डी (Shirdi) विमानतळ सोडण्याची जबाबदारी प्रकाश याच्याकडे देण्यात आली होती. देशातील एक मोठ्या नेत्या त्याच्या गाडीत बसल्याने तो देखील भारावून गेला होता. प्रवासादरम्यान त्याने प्रियंका गांधी यांच्याकडे फोटो काढण्याची ईच्छा व्यक्त केली. मात्र प्रियंका परतीच्या प्रवासासाठी शिर्डी विमानतळावर पोहचताच स्थानिक कार्यकर्त्यांनी भेटीसाठी त्यांना गराडा घातला. 

प्रकाशासाठी त्या थांबल्या 

या सगळ्या गोंधळात देखील प्रियंका गांधी या प्रकाशला विसरल्या नाही आणि त्यांनी कहा गया वो.. अशी विचारणा करत दूर उभ्या असलेल्या प्रकाश खांबकर याला बोलावून घेतले आणि सोबत फोटो काढण्याची त्याची ईच्छा पुर्ण केली. व्यस्त दौरा आणि धावपळीतही प्रियंका गांधी यांनी साई मंदिरात भाविकांची केलेले हस्तांदोलन आणि गाडीचे सारथ्य करणाऱ्या प्रकाश सोबत केलेले फोटो सेशन हे त्यांच्या आजच्या दौऱ्यातील वेगळेपण दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT