Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Crime : ऑनलाईन बुकिंग करून हॉटेलवर गैरकृत्य; पोलिसांची धाड टाकत कारवाई, महिलेची सुटका तर दोघेजण ताब्यात

Shirdi News : शिर्डी जवळील साकुरी हद्दीत महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल उत्सवमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. याठिकाणी नाना शेळके नावाचा एजंट ग्राहकांच्या मोबाईलवर महिलांचे फोटो पाठवत होता

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवर गैरकृत्याचा प्रकार सुरु होता. ओंलीने पद्धतीने बुकिंग करून याठिकाणी वेश्या व्यवसाय चालविला जात होता. या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत हॉटेलमधून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी नजीक असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. शिर्डी जवळील साकुरी हद्दीत महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल उत्सवमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. याठिकाणी नाना शेळके नावाचा एजंट ग्राहकांच्या मोबाईलवर महिलांचे फोटो पाठवत होता. तसेच ग्राहकांकडून पैसे घ्यायचा आणि उत्सव हॉटेलमध्ये गैरकृत्य करण्यासाठी बोलवायचा. 

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांची धाड 

ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसायाबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. नाना शेळके हा हॉटेल उत्सवमध्ये अवैध वेश्या चालवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलवर एक बनावट ग्राहक पाठविला. याठिकाणी खरा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी येथे धाड टाकत कारवाई केली आहे. यामुळे हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. 

हॉटेलमधून महिलेची सुटका  

पोलिसांनी टाकलेल्या धाडमध्ये पोलिसांना येथे एक महिला आढळून आली. दरम्यान कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून संशयित आरोपी नाना शेळके आणि हॉटेलच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT