Shirdi Sai Baba News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News: दीड महिन्यात साईचरणी तब्बल ४७ कोटींचे दान

दीड महिन्यात साईचरणी तब्बल ४७ कोटींचे दान

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी : उन्हाळी सुट्टीच्या काळात भाविकांनी साई चरणी भरभरून दान दिले. २५ एप्रिल ते १५ जून या दीड महिन्यांच्या कालावधीत (Saibaba) साईबाबा संस्थानला तब्बल ४७ कोटी रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे लाखो भाविकांनी या दीड महिन्याच्या कालावधीत (Shirdi) साई दर्शनाला हजेरी लावली. (Tajya Batmya)

गेल्या दीड महिन्यात भक्तांनी साईबाबा संस्थानला दिलेल्या ४७ कोटी रुपयांच्या दानात देणगी कांऊटरवर २६ कोटी. दक्षिणापेटीत १० यासह डेबिट क्रेडिट कार्ड, मनीऑर्डर आणि ऑनलाईन माध्यमातून कोट्यावधींचे दान प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर सव्वा कोटींचे सोने आणि २८ लाखांची चांदीही शिर्डी साईबाबा संस्थानला प्राप्त झाली आहे.

पासच्‍या माध्‍यमातून ११ कोटीचे उत्‍पन्‍न

४७ कोटींच्या दानासह साईबाबा संस्थानला दिड महिन्यात सशुल्क आरती आणि सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून ११ कोटींचे उत्पन्न देखील मिळाले आहे. दरम्यान २२ लाख ४१ हजार भक्तांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला. २१ लाख ९ हजार भक्तांनी मोफत तर ४ लाख २३ भक्तांनी घेतले सशुल्क दर्शनाचा आणि ७० हजार ५७८ भक्तांनी सशुल्क आरतीचा घेतला लाभ घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचा शरद पवारांना फोन; प्रकृतीची केली विचारपूस

Pension Rules : सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी मिळाली, तर पूर्ण पगार अन् पेन्शन किती मिळणार? न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Vastu Shastra: दररोज नकळत तुमच्याकडून होतायत या 4 चुका; घरात येते नकारात्मकता, वास्तुशास्त्राचे नियम वाचा

Sleeping After Heart Attack: डाव्या की उजव्या? हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर कोणत्या कुशीवर झोपणं ठरेल फायदेशीर?

महाराष्ट्रासाठी खूशखबर! मुंबई-बंगळुरूनंतर आणखी एक स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार, कोणत्या शहराला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT