Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : साई चरणी ४२ लाख ८० हजार रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांचे देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : श्री साईबाबांचे भक्त वर्षभर देश विदेशातून दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. काही भाविकांकडून दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर साईचरणी रोख रक्कम स्वरूपात किंवा दागिन्यांचे दान करत असतात. त्याच प्रमाणे एका साईभक्ताने ४२ लाख ८० हजार रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. 

शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांचे देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. त्यानुसार आज एका साईभक्ताने साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा (Saibaba) संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या सोनेरी मुकूटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून मुर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्‍ताने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

आरती दरम्यान मूर्तीवर चढविला मुकुट 

नित्यनियमाप्रमाणे (Shirdi Sai Baba) साईबाबांची आरती होत असते. त्यानुसार आज सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण जडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढवण्यात आला. मुकुट अर्पण केलेल्या भक्ताने आपले नाव गुपित ठेवले आहे.   

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT