Sai Mandir Saam tv
महाराष्ट्र

Sai Mandir : साई मंदिर परिसरात 'नो मास्क..नो दर्शन'; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने लावले फलक

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क झाले आहे. येथे येणाऱ्या (Shirdi) भाविकांना आता मास्क सक्ती करण्यात आली आहे. मंदिर परिसरात (Corona) 'नो मास्क नो दर्शन'चे फलक लावण्यात आले आहे. (Live Marathi news)

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट जेएन १ हळूहळू पसरत आहे. (Corona News Verient) राज्यातील अनेक भागात या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी येथे आले असता त्यांनी कोरोना संदर्भात सूचना करत मास्क सक्तीचे आदेश दिले होते. यामुळे संस्थांच्यावतीने मंदिरांच्या प्रवेशद्वारावर कोरोना संदर्भातील फलक लावण्यात आले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाविकांची गर्दी 

शिर्डी येथे साई दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरु आहे. आता नववर्षानिमित्ताने साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मास्क घेऊनच यावे लागत आहे. अनेक भाविक मास्कसह साई समाधीचे दर्शन घेत आहेत. आगामी नवीन वर्षाचे होणारी गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या भाविकांना मास्क घालूनच दर्शन घ्या असे आवाहन साईबाबा संस्थानचे आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT