Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News: राज्य सरकार जनतेच्या जीवावर उठलेय; नाना पटोले यांची सरकारवर टीका

Shirdi News : राज्य सरकार जनतेच्या जीवावर उठलेय; नाना पटोले यांची सरकारवर टीका

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : औषधे आणि पैशाअभावी कुणाचा जीव जावू नये; यासाठी राजस्थानच्या धर्तीवर राज्यात आरोग्य कायदा करावा. महाराष्ट्रातील सरकार लोकांच्या जिवावर उठले आहे. पाहिले ED सरकार होते, आता त्यात A जोडला गेलाय. त्यामुळे आता हे एडा (EDA) सरकार झाले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज अनेकांचा जिव जातोय. या सरकारच्या कामकाजाचा निषेध आहे. जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या सरकारला आता माफी नाही; अशी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी नांदेडच्या घटनेवर बोलताना केली आहे. (Live Marathi News)


महाराष्ट्राचे सरकार दळभद्री आणी संवेदनाहीन आहे. या सरकारला महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही. सामान्य जनता आणि शेतकरी आजही उपेक्षित आहे. सरकारमध्ये चाललंय काय कळत नाही. हे सरकार गुजरातच्या दोन माणसांसाठी काम करत असून हे सरकार लायक राहीलं नाही अशी जनतेची भावना असल्याचे नाना पटोले म्हणाले. 

अजित पवारांचा आवाज आता बंद झाला 
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात ते खरं आहे. मंत्रीमंडळाचे निर्णय फडणवीसच घेतात. आमच्याकडं तोरा दाखवणाऱ्या आत्ताच्या उपमुख्यमंत्र्यांचा आता आवाज बंद झाल्याचे म्हणत नाना पटोलेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. 

ओबीसींचे शोषण हा भाजपचा पायंडा 

राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या बॉसने सांगितले आम्हाला अभ्यास करावा लागेल. ओबीसींचे शोषण करणे हा भाजपचा नेहमीच पायंडा राहिलाय. भाजपकडून ओबीसींची दिशाभूल केली जात असून मोदी ओबीसी आहेत की नाही ते तपासावे लागेल. दहा वर्षांत त्यांनी ओबीसींच्या बाबत भूमिका घेतली नाही. महाराष्ट्रात ओबीसींच्या मुलांना पाच वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही. मोदी ओबीसी असते तर ओबीसींच्या समस्या सुटल्या असत्या. महिला आरक्षण हा जुमला असून जनगणना करायला सरकार तयार नाही. बॉसचे काम आता दिल्लीतून मोदींच्या इशाऱ्यावर चालत आहे. महाराष्ट्रात भाजपकडून जाती धर्माच्या नावाने भांडणं लावण्याचे काम सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

SCROLL FOR NEXT