Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईचरणी सोन्याचा मुकुट, पंढरीच्या विठुरायाचरणी सोन्याचा हार

Shirdi News : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक हजेरी लावत असतात. सध्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक शिर्डीत साई दर्शन घेण्यासाठी दाखल झाले

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश- विदेशातून दर्शनासाठी येत असतात. यातील काही भाविक हे साईबाबाच्या चरणी रोख रक्कम किंवा सोने- चांदीचे दागिने अर्पण करत असतात. इंदोर येथील भाविकाने साई चरणी १४ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. तर पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी एका भाविकाने ९ लाखाचा सोन्याचा हार अर्पण केला आहे.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक हजेरी लावत असतात. यामुळे मंदिरात दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. तर सध्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक शिर्डीत साई दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. यामुळे सध्या शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान करण्यात येत असते.   

इंदोरच्या भक्तांकडून २०० ग्रॅम सुवर्ण मुकुट अर्पण 

दरम्यान नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इंदोर येथील साईभक्त जुगल जयस्वाल यांनी आज साई चरणी २०० ग्रॅम वजनाचा असलेला १४ लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. अतिशय सुंदर नक्षिकाम असलेला हा सुवर्ण मुकुट मध्यांन आरतीच्या वेळी साईबाबांना परिधान करण्यात आला. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने जयस्वाल परिवाराचा सत्कार करण्यात आला.

वर्षभरात अनेक भाविकांकडून दान 
देश- विदेशातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमधी अनेक भाविक हे आपआपल्या परीने साई चरणी दान देखील करत असतात. यात रोख रकमेसह मनी ऑर्डर, चेक, डीडी, सोने, चांदी, मोती यांचा समावेश असतो. यात तीन महिन्यांपूर्वी देखील एका साईभक्ताने १२ लाखाहून अधिक किमतीचा हिरे जडित सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आला होता. यानंतर इंदोरच्या भाविकाने सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. 

विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी ९ लाखाचा सोन्याचा हार

पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या खजिन्यात सोने- चांदी दागिन्यांची भर पडू लागली आहे. यात एका दानशूर विठ्ठल भक्ताने मोठ्या श्रद्धेने ९ लाख २३ हजार किंमतीचा १३२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार विठ्ठल चरणी अर्पण केला आहे. या भक्ताने सुर्य कळ्यांचा सोन्याचा हार देवाला गुप्तदान केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT