Shirdi Crime Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Crime : शिर्डीत पुन्हा एकावर प्राणघातक हल्ला; दीड महिन्यापूर्वी झालेल्या वादातून हल्ला, तिघेजण ताब्यात

Shirdi News : शिर्डीत दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास आणखी एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शौकत शेख यांच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : पंधरा दिवसांपूर्वी दोन खुणांच्या घटनांनी शिर्डी हादरली होती. यानंतर दिड महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका भाजी विक्रेत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शिर्डीत पुन्हा घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. 

सादिक शेख असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार आहेत. शिर्डीत दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास आणखी एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शौकत शेख यांच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ला झाल्याच्या घटनेने शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे. 

जुन्या वादातून हल्ला 

सादीक शेख (वय ३६) हा तरुण प्राणघातक हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिड महिन्यापूर्वी सादिक शेख याचा काही जणांसोबत वाद झाला होता. याचा राग मनात धरून या किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत असून शिर्डीतील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

तिघेजण पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान शेख याच्यावर हल्ला झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. तर घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिर्डीकरांनी पोलीस ठाण्यावर धाव घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान पोलीसांनी हल्ला करणाऱ्या तीन संशयीतांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT