Shirdi Crime Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Crime : हनुमान मंदिरातील दानपेटी लांबविली; मध्यरात्री दोन ठिकाणी केला हात साफ

Shirdi News : रात्रीच्या सुमारास गावात शांतता असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. प्रामुख्याने मंदिरांवर या चोरटयांनी लक्ष केंद्रित केले असून मंदिरातील दानपेटी व दागिने चोरी करून नेत असल्याच्या घटना घडत आहेत

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : चोरट्यानी मंदिरातील दानपेटींवर देखील नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास हनुमान मंदिरांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. यात हनुमान मंदिरातील दानपेटी घेऊन चोरटे फरार झाले. तर एका शेतकऱ्याला शेतात पाणी भरत असताना तीन अज्ञातांनी जबरी मारहाण केल्याची घटना घडली देखील शिर्डीत घडली आहे. 

रात्रीच्या सुमारास गावात शांतता असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. प्रामुख्याने मंदिरांवर या चोरटयांनी लक्ष केंद्रित केले असून मंदिरातील दानपेटी व दागिने चोरी करून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका मंदिरांत व दुसऱ्या गावात घरफोडी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. यात शिर्डीपासून जवळ असलेल्या पिंपळवाडी गावात चोरी झाली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

हनुमान मंदिरातील दानपेटी लांबविली 

शिर्डी जवळील पिंपळवाडी येथे ग्रामदैवत हनुमान मंदिराची दानपेटी चोरट्यांनी लांबवली आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल रात्री घडलेल्या आणखी एका घटनेत शिर्डी जवळील निमगाव येथील हाउसिंग सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करत सोन्यासह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्रीत घडलेल्या या तीनही घटनांच्या अनुषंगाने शिर्डी पोलिस तपास करत आहेत.

शेतकऱ्याला मारहाण 

तर दुसऱ्या एका घटनेत पिंपळवाडी येथील शेतकरी छबुराव भडांगे हे शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी ते शेतात एकटेच होते. रात्रीच्या अंधारात या शेतकऱ्याला तीन अज्ञातांनी त्यांना जबरी मारहाण करत पोबारा केला. यामुळे  जखमी झाला असून याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT