cm eknath shinde and devendra fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Deoli Assembly Constituency: वर्ध्यातील देवळी विधानसभेवर शिंदे गटाचा दावा, भाजप - सेना येणार आमनेसामने?

Saam Tv

चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी

मागील विधानसभा निवडणुकीत ज्या जागा शिवसेनेने लढल्या होत्या त्या जागांवर आमचा दावा आहे. वरिष्ठ पातळीवर महायुतीच्या नेत्यात याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील निवडणूक लढवल्या जाणाऱ्या जागांवर निरीक्षक नियुक्त केले आहे. माझी वर्धा जिल्ह्याच्या देवळी विधनासभेकारिता नियुक्ती केली. आज या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आली आहे, असं शिंदे गटाच्या नेत्या आमदार भावना गवळी म्हणाल्या आहेत. देवळी येथे आज भावना गवळी यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतलाय.

मागील विधानसभा निवडणुकीत देवळी विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यावेळेस भाजपच्या नेत्याने बंडखोरी करत अपक्ष लढल्याने शिवसेनाच उमेदवारा हा दुसऱ्या क्रमांकावर होता. यामुळे या मतदारसंघात पुन्हा शिंदे गटाने महायुतीत दावा केला आहे.त्या दृष्टीने शिंदे गटाने कामाला सुद्धा सुरवात केली आहे.

मतदारसंघात दौरे, पदाधिकाऱ्यांच्या भेटीचे सत्र शिंदे गटाच्या नेत्यांनी सुरु केले आहे. देवळी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून माजी राज्यमंत्री अशोक शिंदे व शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश इखार यांनी आपली दावेदारी केली आहे.

देवळीच्या निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या भावना गवळी यांनी आज देवळी येथे भेट देत पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांशी चर्चा केलीय. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला. गवळी यांनी देवळीच्या जागेसाठी शिंदे गटाचे नेते माजी राज्य मंत्री अशोक शिंदे इच्छुक असल्याच त्यांनी पत्रकारांना सांगितलंय.

सोबतच कोणती जागा सुटणार कोणती नाहीय याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचही त्यांनी सांगितलंय. या मतदारसंघातील लोकांपर्यंत शिंदे सरकारने केलेली कामे कश्या पद्धतीने पोचतील व सरकारच्या योजनाचा लाभ सामान्य नागरिकांना कसा मिळेल यावर लक्ष देण्याच्या सूचना गवळी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या.

दरम्यान, वर्धा जिल्ह्याच्या चार विधानसभे पैकी एक जागा ही शिंदे गटाने मागितली आहे आणि या जागेसाठी शिंदे गटाकडून तयारी देखील केल्या जातं आहे. आगामी काळात जिल्ह्यात कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाईल, हे काही दिवसात कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT