Mla Santosh Bangar Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे शिवसैनिकांनी (Shiv Sena) हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते, यावेळी हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

यावेळी शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देखील दिल्या आहेत.

हे देखील पाहा

या अगोदरही मंत्री उदय सामंत यांच्या कारवर पुण्यात हल्ला झाला होता. राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT