Nagpur Eknath shinde Saam tv news
महाराष्ट्र

Politics: नागपूरच्या सराईत गुंडाचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण घेतला हाती

Shinde Sena in Nagpur: नागपूरमध्ये सराईत गुन्हेगार युवराज माथनकर याने शिंदे गटात प्रवेश केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात शिंदे गट अधिक बळकट होत असल्याचं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. अशातच नागपुरातील पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात अनेकांनी जाहीर प्रवेश केला. ठाकरे गटाचे माजी नागपूर शहरप्रमुख राजू तुमसरे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यासह, नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकर याने देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नागपूरमध्ये युवराज माथनकर या सराईत गुंडाने थेट शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय खळबळ माजली आहे. माथनकर यांच्यावर लूट, खंडणी, खून यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून, काही वर्षे त्यांनी तुरुंगातही काढली होती. इतकंच नव्हे तर, त्याच्या टोळीवर मकोका लावण्यात आला आहे.

त्यांनी आतापर्यंत अनेक गुन्हे केले असले तरी, प्रत्येक प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. नागपुरात आजही लोक त्यांना गुंड म्हणून ओळखतात. अशा व्यक्तीचा पक्षप्रवेश झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित माथनकर यांनी धनुष्यबाण हाती घेतलं.

नागरपुरात शिवसेनेचा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेश घेणाऱ्याच्या गर्दीत युवराज माथनकर ही होते. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांनी प्रवेश केल्याचं फेटाळलं.

प्रवेश घेतल्यानंतर माथनकर अधिक वेळ थांबले नाही. लगेच निघून गेले. कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता स्थानिक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी करतात. त्यामुळे कुणी वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यायची असते असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

Shraddha Kapoor - Eetha : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाला विरोध; नाव बदलण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Coaching Centre Fire : अग्नितांडव! कोचिंग क्लासला भीषण आग; १५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT