Shinde Government’s Key Welfare Schemes Like Anandacha Shidha and My School Beautiful School Come to a Halt Amidst Budget Constraints Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदेंच्या योजना बंद?

Anandacha Shidha scheme: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरु केलेल्या अनेक योजना आता बंद पडतायत... आनंदाचा शिधानंतर आता आणखी एक योजना बंद झालीय.. शिंदेंच्या कोणत्या महत्त्वकांक्षी योजनेवर लाल फुल्ली मारण्यात आलीय? या योजना बंद होण्यामागे नेमकं कारण काय?

Omkar Sonawane

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना थंड बस्त्यात गेल्याची चर्चा आहे. आनंदाचा शिधा योजनेनंतर आता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजनेलाही ब्रेक लागलाय...शाळेची स्वच्छता सौर्दयीकरण आणि पायाभुत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू केलेली ही योजना... मात्र आता आनंदाचा शिधा नंतर या योजनवरही लाल शेरा मारला गेलाय. या दोन्ही योजनांवर शिंदेंच्या कार्यकाळात किती खर्च करण्यात आला..

माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना केवळ वर्षभरच राबवण्यात आली.. त्यासाठी 2024 मध्ये सरकारनं 86 कोटी 73 लाख रुपये खर्चाची तरतुद केली होती...आनंदाचा शिधा योजनेचा 2023 मध्ये 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यासाठी 530 कोटी 19 लाख रुपये इतका खर्च आला.. तर 2024 मध्ये 1 कोटी 82 हजार 86 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी 563 कोटी 51 लाख रुपये सरकारकडून खर्च करण्यात आला

मात्र या दोन्ही योजना बंद पडल्यानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या पण आता बंद झालेल्या योजनांवरून महायुती सरकारवर निशाणा साधलाय...एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील आनंदाचा शिधा, माझी शाळा, सुंदर शाळा, 1 रुपयात पीकविमा, स्वच्छता मॉनिटर योजना, 1 राज्य 1 गणेवश, युवा कार्य प्रशिक्षण, योजनादूत योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बंद झाल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय...

दरम्यान शिंदेंच्या कार्यकाळातील योजनांवर लाल शेरा मारला जात असल्यानं सत्ताधाऱ्यांनी योजनांचा तिजोरीवरील भार स्पष्ट शब्दात मांडला तर विरोधकांनी मतांसाठीच्या योजना म्हणत शिंदेंवर टीका केलीय..विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.. ज्यामुळे वर्षाला 36 हजार कोटी रुपये लाडकीसाठी खर्च केले जातायत... अशातच लाडकीचा हा भार राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक बोजा वाढवत असल्यानं लोकप्रिय योजना राबवताना सरकारची कसरत होतेय, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालयं... एकूणच काय योजना जाहीर करता येते पण त्यासाठी पैशांचं सोंग काही आणता येत नाही हेच खरं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case: अंगावर जखमा, तोंडात मोजा कोंबला; चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक माहिती उघड

Malshej Ghat : माळशेज घाटाजवळ एसटी बसचा भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Maharashtra News Live Update : पंढरपूरच्या कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची मान्यता

Wedding Market News: ऐकावं ते नवलच! येथे भरतो चक्क 'नवरा-नवरीचा' बाजार; भिंतीवरचे कागद वाचून ठरतात लग्न!

World Asthma Day: वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांवर कसा परिणाम होतो? थॅलेसेमिया रुग्णांसाठी महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT