ST Employee Diwali Bonus Saam Tv
महाराष्ट्र

ST Employee Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार जोरदार; सरकार देणार 'इतक्या' हजारांचा बोनस

ST Employee: एसटी संघटनांनी यंदा दिवाळीचा बोनस सरसकट १५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती.

Bharat Jadhav

ST Employee Diwali Bonus:

शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचं जाहीर केलंय. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये एक हजार रुपयांची वाढ केलीय. सरकार एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ६ हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांचा बोनस दिला गेला होता. (Latest News)

दरम्यान एसटी संघटनांनी यंदा दिवाळीचा बोनस सरसकट १५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र शिंदे सरकारकडून ही मागणी मान्य झालेली नाही. परंतु बोनसमध्ये वाढ झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी महामंडळाचे एमडी शेखर चन्ने आणि सेवा शक्ती संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली होती.

गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्त्वाखाली सातवा वेतन आयोग आणि विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा एल्गार उगारण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली. यात दिवाळी बोनससह सातवा आयोग किंवा विलनीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत ३० नोव्हेंबरच्या आत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT