MLC Election Result News  AI Image
महाराष्ट्र

MLC Election Result: २८ जागांचा निकाल जाहीर! कुणाची बाजी अन् कुणाला धक्का? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

MLC Election Result 2026 News : विधान परिषद शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा २८ जागांचा निकाल जाहीर झाला असून. यामध्ये भाजपला १३ जागांवर यश, तर नागपूरमध्ये काँग्रेस आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने विजय मिळवला. जाणून घ्या पक्षनिहाय निकाल.

Alisha Khedekar

  • विधान परिषद निवडणुकीचा निकाल अनपेक्षित

  • भाजपने १३ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा जिंकल्या

  • काँग्रेसने देशभरातील २८ जगांपैकी १ जागा जिंकली

  • शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला

देशभरात झालेल्या विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर आणि वाराणसीमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान देशभरात काँग्रेस २८ पैकी एका जागेवर निवडून आल्याने राजकारणात विविध चर्चा सुरु आहेत. जाणून घ्या २८ जागांवर कोणी कुठे मारली बाजी?

भाजपला काही राज्यांत फटका

या निवडणुकीत भाजपला अनेक जागांवर यश मिळाले असले, तरी काही महत्त्वाच्या मतदारसंघांत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. विशेषतः नागपूरमध्ये काँग्रेसने, तर वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाने विजय मिळवला. त्यामुळे या निवडणुकीत भाजपसह अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसल्याचे चित्र आहे. या निकालातून शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी काही ठिकाणी सत्ताधारी पक्षांविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येते.

बिहार आणि कर्नाटकमध्येही वेगवेगळे निकाल

बिहारमध्ये पदवीधर मतदारांनी सरकारच्या बाजूने कौल दिल्याचे चित्र दिसले, तर शिक्षक मतदारांनी विरोधकांना पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारांची भूमिका वेगवेगळी असल्याचे निकालातून स्पष्ट झाले. कर्नाटकमध्येही काँग्रेसला नाराजीचा सामना करावा लागला.

महाराष्ट्रात महायुती आणि विरोधकांची लढत

महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निकालांनी राजकीय पक्षांचे लक्ष वेधले. काही ठिकाणी महायुतीला यश मिळाले, तर नागपूरमध्ये काँग्रेसने विजय मिळवत भाजपला धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटानेही दोन जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पक्षाचा या निवडणुकीतील स्ट्राइक रेट शंभर टक्के राहिला. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी विरोधी पक्षांनीही काही महत्त्वाच्या मतदारसंघांत विजय मिळवला.

देशभरात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ?

  • भाजपला १३ जागांवर यश मिळाले - १३ (महाराष्ट्र-1, बिहार-3, उत्तर प्रदेश-6, कर्नाटक-3)

  • शिंदे सेनेला एका जागेवर यश मिळालं

  • शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागांवर यश मिळालं

  • भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसची एका जागेवर बाजी

  • समाजवादी पक्षाला उत्तरप्रदेशात ५ जागेंवर यश मिळाले

  • JDU पक्षाला १, तर JDS पक्षाने कर्नाटकात एका जागेवर यश खेचून आणलं.

  • जनसुराज्य १, RJD १ तर अपक्ष २ ठिकाणी विजयी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : महायुती म्हणून एकत्र लढलो असतो, तर चित्र वेगळं असतं – नवनाथ बन

Sinhagad Fort : पावसाळ्यात धुक्याची चादर, हिवाळ्यात गारवा; सिंहगड किल्ला 'का' इतका खास?

Sanjay Raut: संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाची मागितली माफी; तरीही १७ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

Maharashtra : सरकारचा मोठा निर्णय! आणखी एक महत्त्वाची योजना बंद; कारण काय?

Tharala Tar Mag : सायलीची कोर्टातच होणार डिलिव्हरी, लवकरच 'ठरलं तर मग'मध्ये नव्या पाहुण्याचं आगमन|VIDEO

SCROLL FOR NEXT