jayant patil 
महाराष्ट्र

'गडकरी सारख्या निष्ठावंतापेक्षा भाजपात उपऱ्यांचीच गर्दी'

विकास मिरगणे

खोपोली : भारतीय जनता पक्षा हा आता तत्वांचा पक्ष राहिलेला नाही. भाजप हा विचारांचा पक्ष हाेता. त्यांचे चांगले संघटन होते परंतु आता भाजपात उपरे वाढू लागल्याने पक्षाकडे काेणतीही ध्येय धाेरण उद्दीष्ट राहिली नसल्याची टीका शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी येथे केली. शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा येथील समर्थ मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी आमदार पाटील बाेलत हाेते. shetkari-kamgar-paksha-leader-jayant-patil-on-bjp-khopali-marathi-news-sml80

आमदार जयंत पाटील म्हणाले एक दाेन जण भाजपात जाऊन आले. त्यांना समजले आहे आता ताे पक्ष पहिल्या सारखा राहिलेला नाही. भाजप तसेच शेकापची उद्दीष्ठ पुर्णतः वेगळी आहेत. त्याकाळी भाजपातील नेते-कार्यकर्ते यांच्यात उत्तम वातावरण हाेते पण आता भाजपातील निष्ठावंत कमी हाेऊ लागले आहेत आणि उपऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. नितीन गडकरी यांच्या सारखे निष्ठावंत नेते आता भाजपात घडत नाहीत असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान शेकाप आगामी काळातील निवडणूक स्वबळावर लढवू शकते तरी देखील रायगडात कोणाबरोबर युती करायची याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करू असे आमदार पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT