Meenakshi Patil Death Latest News saam tv
महाराष्ट्र

Meenakshi Patil Death : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन; शेकापचं झुंजार नेतृत्व हरपलं

former minister Minakshi patil death : शेकाप नेत्या मिनाक्षी पाटील यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. मिनाक्षी पाटील यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी पेझारी येथे अंत्यविधी होणार आहे.

Vishal Gangurde

Meenakshi Patil Passes Away :

शेकाप नेत्या मिनाक्षी पाटील यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. मिनाक्षी पाटील यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी पेझारी येथे अंत्यविधी होणार आहे. मिनाक्षी पाटील यांच्या निधनाने शेकापच्या कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

अलिबागच्या माजी आमदार, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांची शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. मिनाक्षी पाटील यांनी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं.

मिनाक्षी पाटील (Meenakshi Patil) यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या (Alibaug Vidhan Sabha) तीन वेळा आमदार होत्या. त्यांनी १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.

मिनाक्षी पाटील (Meenakshi Patil) या शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या भगिनी होत. तसेच त्या शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या मातोश्री होत. मिनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. मिनाक्षी पाटील यांची अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

मीनाक्षी पाटील यांच्या मृत्यूनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'एक्स' प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. शरद पवार म्हणाले, 'माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या एक झुंजार नेत्या अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT