Raigad : विधानसभेत अलिबागच्या आमदाराची छाप पडत नाही - जयंत पाटील  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad : विधानसभेत अलिबागच्या आमदाराची छाप पडत नाही - जयंत पाटील

आपल्या अलिबागच्या आमदारांची छाप पडत नसल्याने आमची आठवण मंत्री, अधिकारी शिपाई काढतात अशी शेलक्या शब्दात आमदार दळवी यांच्यावर जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग विधानसभा मतदारसंघातून अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व करून सभागृह गाजविले आहे. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची विधानसभा सभागृहात छाप पडत नसल्याची नाराजी भाषणातून व्यक्त करून दळवी यांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. विधानसभा सभागृहात मंत्री, आमदार यांचे मूल्यमापन हे तेथील शिपाई करत असतात.

हे देखील पहा :

मात्र, आपल्या अलिबागच्या आमदारांची छाप पडत नसल्याने आमची आठवण मंत्री, अधिकारी शिपाई काढतात अशी शेलक्या शब्दात आमदार दळवी याच्यावर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांत संघर्ष पेटण्याची शक्यता या टिकेमुळे निर्माण झाली आहे.

आगामी अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज अलिबाग भाग्यलक्ष्मी सभागृहात आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग नगरपरिषद हद्दीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, राजीप सदस्य ऍड आस्वाद पाटील, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणावेळी त्यांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विधानसभा सभागृहातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT