mahesh shinde & shashikant shinde 
महाराष्ट्र

शशिकांत शिंदेंना वाढदिनी भल्या पहाटे महेश शिंदेंनी दिला धक्का

ओंकार कदम

सातारा : जिल्ह्यातील खटाव या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण अशी असणारी जिहे-कटापुर ही योजनेचे गेल्या २६ वर्षांपासून धिम्या गतीने काम सुरू होते. अखेर आज २६ वर्षांनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. या योजनेचा फायदा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठया प्रमात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते. या भागाचे तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे स्वतः जलसंपदा मंत्री असताना सुद्धा ही योजना पूर्ण होऊ शकली नव्हती. परंतु आज भल्या पहाटे या योजनेचा उदघाटन समारंभ घेऊन काेरेगाव खटाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी एकप्रकारे आमदार शशिकांत शिंदेंना धक्काच दिल्याचे बोलले जात आहे. shashikant-shinde-birthday-mahesh-shinde-khatav-satara-political-news-sml80

आज आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस असून त्या दिवशीच त्यांचे राजकीय विरोधक महेश शिंदेंनी या योजनेचे उदघाटन करून आमदार शशिकांत शिंदेंना भल्या पहाटे धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार महेश शिंदे यांनी जलपूजन केले. त्यावेळी त्यांचे समर्थक आणि काेरेगाव व खटाव तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT