Sharad Pawar Latest Marathi News, Sharad Pawar in Satara, Karmaveer Bhaurao Patil Punytithi Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातून येत्या जूनपासून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल'

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज शरद पवार सातारा दाै-यावर आहेत.

Siddharth Latkar

सातारा : येत्या शैक्षणिक वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या (rayat shikshan sanstha) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातून (karmaveer bhaurao patil university) विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी येथे (satara) व्यक्त केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयाेजिलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते पवार बाेलत आहेत. (Sharad Pawar Latest Marathi News)

पवार म्हणाले अण्णांनी शिक्षणाचे कार्य हातात घेतले आणि त्यांचे संपुर्ण आयुष्य त्यासाठी वेचले. आज रयत शिक्षण संस्था देशातील एक महत्वाची संस्था झालेली आहे. अण्णांनी लावलेल्या राेपट्याचे वटवृक्ष झाले. त्यास तुम्ही सर्वांनी शेंद्रिय खत पाणी घातले. त्यामुळे या वृक्षाची वाढ निराेगीपणाने झाली आहे.

सर्व सामान्यांना शिक्षण (education) हा हेतु डाेळ्यासमाेर ठेवून सुरु केलेले कार्याचा फायदा आज लाखाे कुटुंबातील मुलांना हाेत आहे. रयतने स्वत:चे विद्यापीठ काढावे अशी अण्णांची इच्छा हाेती. त्याची मुहुर्तमेढ येत्या जूनपासून हाेईल याची खात्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

प्रारंभी संस्थेतील कर्मचा-यांचा ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते पारिताेषिक देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान यावेळी ज्येष्ठ नेते पवार यांनी (कै.) एन.डी.पाटील, (कै.) शंकरराव काेल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: मुंबई- आग्रा महामार्गावर अपघाताचा थरार, डंपरखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: पंढरपूर माढा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव; दोन गट आमनेसामने

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? तुझ्या मुलीला पाठव, 10 हजार देतो; वासनांध पोलिसाची शरीरसुखाची आरोपी महिलेकडे मागणी

Water Tanker Cooling Tips : उन्हामुळे टाकीतील पाणी होते गरम? 'हे' 5 देसी उपाय करा, पाणी राहील थंड

Paithani Saree Suitable Blouse: लग्न सोहळ्यात पैठणी साडीवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी परफेक्ट ब्लाऊज

SCROLL FOR NEXT