Sharad Pawar Resigns Latest Update Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar Latest News: मोठी बातमी! पुढील २ दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar Resigns: मोठी बातमी! पुढील २ दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Satish Kengar

Sharad Pawar Resigns Latest Update: शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

आज याच कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला आहे. 'दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावा लागणार नाही', असं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.

Sharad Pawar : काय म्हणाले शरद पवार?

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले आहेत की, "जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. उद्या पक्षाचं कामकाज असं चालावं, त्यातून नवीन नेतृत्व मजबूत करावं हा माझा हेतू होता, असे निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती, पण ती माझ्याकडून घेतली गेली नाही.''  (Latest Marathi News)

Sharad Pawar Latest News:'अंतिम निर्णय एक ते दोन दिवसात'

पवार म्हणाले की, ''आता हा जो निर्णय घेतला त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून जे लोक आले त्यांनी सांगू इच्छितो की, संध्याकाळी मी बैठक घेईल, त्यानंतर अंतिम निर्णय एक ते दोन दिवसात घेऊ. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही.''

दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करत होते. काहींनी आपल्या रक्ताने शरद पवार यांना निर्णय मागे पत्र लिहिले. हे सगळं पाहून शरद पवार हे आंदोलकांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना दोन दिवसानंतर निर्णय सांगतो, असं सांगितलं. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जोश पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम?

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT