Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले... नैतिकता आणि यांचा संबंधच नाही

Dhananjay Munde resignation controversy: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. तसेच अजित पवार यांना खोचक टोला लगावलाय.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या कचाट्यात सापडले. विरोधकांकडून चहुबाजूने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राजीनाम्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. तसेच अजित पवार यांना खोचक टोलाही लगावला आहे.

'सरकारने मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतल्याचं दिसून येत नाही. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा की नाही, हे स्वत: धनंजय मुंडे यांनी ठरवावं. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा मी राजीनामा दिला होता', असं अजित पवार म्हणालेत.

यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला. 'या लोकांचा आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का?' असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, 'याआधी जेव्हा एखाद्या मंत्र्यांवर आरोप झाले तर, त्यांचा राजीनामा घेण्यात येत होते. पण आता मुद्दा असा आहे की, नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध आहे का?' असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

तसेच मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी, 'स्वाभिमान असलेल्या कोणत्याही व्यक्तीने राजीनामा दिला असता', असं शरद पवार म्हणालेत.

मंत्री माणिकराव कोकाटे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका आरोपाखाली त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावर शरद पवार म्हणाले, 'हे महाराष्ट्रासाठी चांगले लक्षण नाही. अशा आरोपांना सामोरे गेलेल्या काही नेत्यांनी याआधी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा दिला आहे. पण या सरकारकडून नैतिकतेची अपेक्षा करणं व्यर्थ आहे', असंही शरद पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT