सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे. करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी भाजप महायुतीच्या मेळाव्यात हजेरी लावली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात महाविकास आघाडीतील आमदाराची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
विशेष म्हणजे, आमदार नारायण आबा पाटील हे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपासून दूर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता थेट भाजप महायुतीच्या व्यासपीठावर त्यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर आणि सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांचाही भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असताना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या मेळाव्यात उपस्थित राहिल्याने सोलापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. जयकुमार गोरे यांनी केलेल्या पाठिंब्याच्या दाव्यामुळे या घडामोडींना वेग आला आहे.
या मेळाव्यात बोलताना जयकुमार गोरे यांनी बार्शीच्या पाण्याचा मुद्दाही उपस्थित केला. राजाभाऊ राऊत निवडून आले म्हणून बार्शीला पाणी आलं, असं विधान त्यांनी केलं. तसंच, पदवीधर मतदारांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांच्या उमेदवाराला निवडून दिल्यास पदवीधरांना न्याय मिळेल, असं आवाहनही त्यांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.