Sharad Pawar NCP saam tv
महाराष्ट्र

पवारांच्या राष्ट्रवादीत डिलिमिटेशनवरून मतभेद? आमच्यासाठी आई-वडिलांचा शब्द अंतिम' सुप्रिया सुळेंचा आव्हाडांना टोला

Delimitation Row: आमदार जितेंद्र आव्हाडांची कन्य़ा नताशा आव्हाडनं डिलिमिटेशनवरून थेट पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केलाय. मात्र यावर आव्हाडांची काय भूमिका आहे? खासदार सुप्रिया सुळेंनी आव्हाडांना काय सल्ला दिलाय? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राजकीय वर्तुळात सध्या 'डिलिमिटेशन' विधेयकावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या मुद्द्यावर राजधानी दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातलं राजकारण जास्त तापलंय. डिलिमिटेशनला पाठिंब्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीतच मतभेद असल्याचं पुढं आलंय. खासदार सु्प्रिया सुळेंनी डिलिमिटेशनला सशर्त पाठिंबा दर्शवलाय. मात्र याविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी उघडपणे विरोध दर्शवलाय. नताशा आव्हाडांनी डिलिमिटेशनला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखं असल्याची टोकाची टीका केलीय. त्या काय म्हटल्या आहे ते पाहूयात...

नताशा आव्हाडांचा सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला विरोध

माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. ((कट करता येईल-- मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्यानं घसरत असताना सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. )) या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकानं या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षानं आपल्या भूमिकेचा फेरविराच करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो

नताशा आव्हाडांच्या या भूमिकेला आव्हाडांनी समर्थन दिलं नसलं तरी तिला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. सुप्रिया सुळेंनी मात्र यावरून आव्हाडांना टोला लगावलाय. आमच्यासाठी आमच्या आईवडिलांचा शब्द अंतिम असतो अशी भूमिका मांडलीय.

एका बाजूला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया येत असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी मात्र नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचे समर्थन केलयं...शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की,

पक्षनिष्ठेचा अर्थ आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला मूग गिळून गप्प बसणे असा होऊ शकत नाही. डिलिमिटेशनप्रकरणी आपल्या पक्षाच्या भूमिकेवर प्रामाणिकपणे मत मांडल्याबद्दल नताशा आव्हाडचा आदर वाटतो. जेव्हा संवैधानिक प्रश्न निर्माण होतात, तेव्हा स्वतःच्या बाजूलाही प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या अशा अधिक आवाजांची आपल्याला गरज असते.

डिलिमिटेशनवर मविआमध्ये आधीच मतभेद उघड झाले आहेत. आता नताशा आव्हाडांच्या भूमिकेमुळे पवारांच्या राष्ट्रवादीतही मतं मतांतर असल्याचं पुढं आलंय. मुळात विलिनीकरण आणि डिलिमिटेशनवर जितेंद्र आव्हाडांनी गेल्या काही दिवसांपासून मौन बाळगलंय. मात्र मुलीच्या आडून जितेंद्र आव्हाडांनीच आपली खदखद तर बाहेर काढली नाही ना? डिलिमिटेशनवरून पवारांच्या राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: आज या 3 राशींचे नशीब चमकणार! कोणाला मिळणार यश, तर कोणाला पैशांचा लाभ?

मोबाईलनं केलं म्हाताऱ्यांनाही वेडं, आजीबाईंवर हॉस्पिटलमध्ये उपचाराची वेळ

AI माणसाला संपवणार? AIच्या गॉडफादरची भविष्यवाणी?

मुंबईतील 'जलसा'वर गोळीबाराचा कट बिग बी कुणाच्या निशाण्यावर? Bollywood पुन्हा हादरलं

Bus Fire: 50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग

SCROLL FOR NEXT