SHARAD PAWAR’S 17 DEMANDS TO CM FADNAVIS FOR MAHARASHTRA DROUGHT RELIEF saam tv
महाराष्ट्र

शरद पवारांचं CM फडणवीसांना पत्र; 17 मोठ्या मागण्या

Sharad Pawar Letter To Devendra Fadnavis On Maharashtra Drought: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून १७ मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १ लाख रुपये मदत, कर्जमाफी आणि मोफत धान्याची मागणी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane, Bharat Mohalkar

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल १७ मागण्या करण्यात आल्या आहेत.

शेती आणि शेती व्यवसायासाठी घेतलेल्या सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका, अर्बन बँका तसेच पतसंस्थांच्या कर्जमाफीची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. तसेच जमीन महसूल आणि कृषी वीजबिल माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो मोफत धान्य देण्यासोबतच थेट आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १ लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत आणि जलसंधारणासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, असेही पत्रात म्हटले आहे. दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने शैक्षणिक फी, वसतिगृह फी आणि मेस फी माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर फळबागा आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशीही मागणी शरद पवार यांनी केली आहे. दसरा आणि दिवाळीपूर्वी शेतकरी व शेतमजुरांना मदत मिळावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री छगन भुजबळ पोहोचले येवल्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर..

Diabetes: आजारपणात रक्तातील साखर वाढतेय? हे डायबिटीज होण्याचे संकेत असतात का?

राजकारण जोमात! दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र; विखे थेट बाळासाहेब थोरातांच्या पाया पडले

Naigaon Travel : नायगावपासून हाकेच्या अंतरावर आहेत ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स, फॅमिली ट्रिप करा प्लान

Vidhan Parishad Election: महायुतीनं उमेदवारी नाही दिली तर आम्ही देऊ; मंगेश चिवटेंना कोणी दिली ऑफर?

SCROLL FOR NEXT