Narayan Rane On Sharad Pawar Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पवारांना ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मॆलाई आहे. त्यांना धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता विविध पक्षाचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. यावरच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
ते म्हणाले आहेत की, ''कुठे आली धमकी? कोणी दिली धमकी? त्याचं मी काय करू? गृहमंत्र्यांना सांगा, माझ्याकडे ते खाते नाही.'' राणे म्हणाले, ''कोणाला ही धमक्या येत असतील तर पोलीस खाते सक्षम आहे. त्यांना आणि राऊत यांचं धमक्या येतात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अगदी चांगले आणि दर्जेदार आहे.''
नारायण राणे पुढे म्हणाले, ''मुद्दामून मस्ती करायची आणि नंतर म्हणायचं कायदा आणि सुव्यसवःथा बरोबर नाही, हे चांगल नाही.'' संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, '' ज्या माणसाचं नाव घेताय तुम्ही त्याचं रोज सकाळी उठायचं आणि ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर हेच सुरु असतं.'' ते म्हणाले, पवार यांना धमकी मिळाली असेल, त्याबद्दल मला माहिती नाही.
शरद पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ
शरद पवार यांना मिळाल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या धमकीनंतर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
संजय आणि सुनील राऊत यांनाही धमकी
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुनील राऊत यांनाही धमकीचे फोन आले आहेत. सुनील राऊत यांच्या फोनवर अज्ञाताने कॉल करुन दोघाही भावांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.