Sharad Pawar  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: हे म्हातारं थांबणार नाही! रामराजे नाईक निंबाळकरांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर शरद पवारांचं महाय़ुतीला चॅलेंज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अजित पवारांकडून वारंवार शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला जातो. मात्र 84 च काय 90 वर्ष झालं तरी हे म्हातारं काही थांबणार नसल्याचं विधान शऱद पवारांनी केलंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी महायुतीच्या नेत्यांना गळाला लावून महायुतीला सुरुंग लावलाय.

त्यातच रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू संजीवराजे निंबाळकर, रामराजेंचा मुलगा अनिकेतराजे आणि दादांच्या पक्षाचे आमदार दीपक चव्हाण पवारांच्या तंबूत परतले आहेत. या पक्षप्रवेशावेळी आपण महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार पवारांनी केलाय

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना गळाला लावत पवारांना आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि त्यानंतर भाजपला खिंडार पाडलंय. तर आगामी काळात आणखी नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याचे संकेत पवारांनी दिलेत. कोणते नेते तुतारी फुंकण्याची शक्यता आहे? पाहूयात.

दादांचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकण्याची शक्यता

दादांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदेंचे तुतारी फुंकण्याचे संकेत.

अजित पवारांच्या पक्षाचे माजी आमदार राजेंद्र देशमुखांनी घेतली पवारांची भेट

आमदार सतिश चव्हाण तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत.

दादांच्या पक्षाचे माजी आमदार रमेश थोरात पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता

दादांच्या पक्षाचे नेते विलास लांडेंनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेत.

मधुकर पिचडांनी पवारांची भेट घेत तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी आता थांबणार नसल्याचे संकेत देतानाच महायुतीला खिंडार पाडण्याची योजना आखलीय. मात्र पवारांच्या या रणनीतीला यश येणार की महायुती प्रतिडाव टाकणार? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bopdev Ghat Case : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी सापडला; पोलिसांनी असं शोधलं

Government Job: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ३४४ रिक्त जागा; पात्रता अन् पगार किती? जाणून घ्या

Dhule Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर खासगी बसची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Kendra Tirkon Rajyog: शनीदेव बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; ‘या’ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट; कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस? वाचा...

SCROLL FOR NEXT