Maharashtra Politics Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवार, अजित पवारांसह सुप्रिया सुळेही पहिल्यांदाच एका मंचावर; कधी अन् कुठे आहे कार्यक्रम?

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय म्हणजेच शरद पवार , अजित पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, प्रतिनिधी

Maharashtra Politics News:

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या पक्षफुटीमुळेच राष्ट्रवादीमध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असल्याने मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीमधील दोन गटात संघर्ष सुरू असतानाच पवार कुटुंबीय म्हणजेच शरद पवार अन् अजित पवार एका मंचावर येणार आहेत.

राष्ट्रवादीमधील (NCP Crisis) फुटीनंतर दोन्ही गटांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर पवार कुटुंबीयही एका मंचावर आले नव्हते. मात्र लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकाच मंचावर येणार आहेत.

दौंडमध्ये (Daund) २२ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटन प्रसंगी पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम विद्या प्रतिष्ठान स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटनाचा कार्यक्रम आहे. २२ ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या नव्या वास्तूचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थितीत राहणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीमधील संघर्षाची सुनावणी सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. या सुनावणीत दोन्ही गटांकडून एकमेंकावर आरोप केले जात आहेत. काही दिवसांपुर्वीच शरद पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असल्याची टीका केली होती. त्यामुळे या कार्यक्रमात पुन्हा टीका- टिप्पणी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi Bhang Hangover: भांगची नशा कशी उतरवायची?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?

Holi Hair Care Tips: होळीचा रंग केसांमधून कसा काढायचा? ही आहे सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : धूलीवंदन निमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवेच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT