Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: राज ठाकरे उत्तम व्याख्याते; मोजक्या शब्दांत शरद पवारांनी घेतला समाचार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काेल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला.

संभाजी थोरात

काेल्हापूर : राज ठाकरे यांच्याकडे आकडे मर्यादित आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आकडे आहेत. त्यामुळे त्यांना लोकांचा प्रतिसाद किती आहे ते कळते. राज ठाकरे (raj thackeray) काहीही बोलू शकतात असा टाेला ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी आज काेल्हापूरात (kolhapur) माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंना लगावला. (sharad pawar latest marathi news)

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीपातीचे राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादीचा जन्म झाल्याची टीका केली हाेती. त्यावर पवार यांनी माध्यमांशी बाेलताना राज ठाकरेंचा अभ्यास कमी असल्याचे म्हटलं.

उत्तरप्रदेशात योगींच्या राज्यात लखमीपूर घटनेसारख्या घटना घडल्या होत्या. असे सरकार ठाकरेंना पाहिजे असेल तर काही इलाज नाही. महाराष्ट्रात उध्दव ठाकरेंच्या (uddhav thackeray) नेतृत्वखालील सरकारमध्ये अस होऊ दिल जाणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले.

सामाजिक ऐक्य बिघडावं असे वक्तव्य सातत्याने हाेऊ लागली आहेत. जाती पातीचे राजकारण काेण करीत आहेत हे सर्वांना माहित आहेत. ते एखादे व्याख्यान देतात आणि चार सहा महिने निघून (भूमीगत) जातात. कूठे असतात. काेणाला माहित नसते. त्यांच्या ताेंडाला काेणी लगाम लावू शकत नाही असा टाेलाही पवारांनी मारला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT