shankar sahakari sakhar karkhana election result saam tv
महाराष्ट्र

Ranjitsinh Naik Nimbalkar : शंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल; मोहिते-पाटील गटाचा रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटास दणका

Shankar Sahakari Sakhar Karkhana Election Result : माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा अंतिम निकाल आज जाहीर झाला.

भारत नागणे

Pandharpur News :

माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत मोहिते- पाटील गटाने दणदणीत विजय मिळविला आहे. दोन जागांसाठी झालेल्या निवडणूकीत विजयसिंह मोहिते- पाटील (vijaysinh mohite patil) यांच्या पॅनलचे दाेन्ही उमेदवार तब्बल तीन हजार मतांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉजीट जप्त झाले आहे. (Maharashtra News)

माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीची प्रक्रियेत यापूर्वी 21 पैकी 19 जागा बिनविरोध झाल्या होत्या. या कारखान्याच्या दाेन जागांसाठी निवडणुक झाली. यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) आणि धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यातील अंतर्गत राजकीय संघर्षामुळे येथील साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निकालाकडे सातारा आणि साेलापूर जिल्ह्यात लक्ष लागून राहिले हाेते.

या निवडणुकीत माेहिते-पाटील गटाने बाजी मारली. त्यांचे दाेन्ही उमेदवार तब्बल तीन हजार मतांनी निवडून आले आहेत. या निकालानंतर माेहिते-पाटील समर्थकांनी जल्लाेष केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT