Shambhuraj Desai, Satara, CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : सीएम शिंदेंचा दाैरा हाेताच साता-याच्या विकासासाठी मंत्रालयात बैठकांचा सपाटा, असंही ठरलं

पालकमंत्री शंभूराज देसाईंनी बैठक घेत दिल्या महत्वपुर्ण सूचना.

Siddharth Latkar

Shambhuraj Desai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दाेन दिवसांचा सातारा जिल्ह्याचा दाैरा पुर्ण हाेताच जिल्ह्यातील पर्यटनाच्या विकासासाठी मंत्रालयात बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी मंत्रालयात तातडीने एक बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा आढावा घेतलेल्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. (Satara Latest Marathi News)

महाबळेश्वर- पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक प्रलंबित विविध कामांचा आढावा मंत्री श्री. देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्रालयात आयोजिलेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महाबळेश्वरच्या धर्तीवर तापोळा परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वंकष विकास आराखडा तयार करून तो तातडीने सादर करावा. या आराखड्यात तापोळ्याचे सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरण वाढेल, असे नियोजन करावे. महाबळेश्वरच्या (mahableshwar) सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यासाठी लवकरच पाहणी करून बैठक घेण्यात येईल. (Maharashtra News)

बैठकीतील निर्णय

पर्यटन केंद्रांच्या परिसरात स्वच्छता व सांडपाण्याचे नियोजन करावे.

सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात पावसाळ्यात नागरिकांच्या सोयीसाठी दळणवळण, पायाभूत आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

दरे येथे आदर्श आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करावे. या उपकेंद्रांत आवश्यक औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा.

आवश्यक तेथे लहान पूल, रस्ते दुरुस्त करावेत. पावसाळ्यातही या भागाशी संपर्क होईल, असे नियोजन करावे.

नागरिकांच्या सुविधेसाठी बार्ज घ्यावी. त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन समिती, राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल.

शालेय मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वॉटर टॅक्सी सुविधा कार्यान्वित करावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करावे.

सातारा जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करावे. त्यासाठी १०८ या रुग्ण वाहिकांचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे.

महाबळेश्वर येथील सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव सादर करावा.

याशिवाय २२ तलाठी आणि चार मंडळाधिकारी कार्यालयांसाठी इमारतीचाही प्रस्ताव सादर करावा.

रस्ते, वाहतूक, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आदी विषयांचाही मंत्री देसाईंनी घेतला सविस्तर आढावा.

यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, साताराचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, महसूल विभागाचे सहसचिव अतुल कोदे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी, महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. साताराचे (satara) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT