Udayanraje Bhosale 
महाराष्ट्र

आम्ही पाणी द्यायचं काम करताे, पाजण्याचे नाही; उदयनराजे

Siddharth Latkar

सातारा : मला श्रेय मिळेल म्हणून तत्कालीन आमदार आणि त्यावेळेचे पालकमंत्री यांनी पाणी याेजना हाणून पाडल्याने तुमच्यासह २२ गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. परंतु आम्ही पाठपूरावा करुन याेजना पुर्णत्वास आणली आहे. दिवाळापुर्वी तुम्हांला पाणी मिळून जाईल असे खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले. shahupuri-development-bhoomipujan-udayanraje-bhosale-on-water-satara-marathi-news-sml80

पालिकेच्यावतीने करंजे परिसर, दाैलतनगर, तामजाईनगर भागातील विविध विकासकामांचे भुमीपूजन, लोकार्पण कार्यक्रम आज (शुक्रवार) उदयनराजेंच्या उपस्थित झाला. त्यावेळी ते बाेलत हाेते.

खासदार उदयनराजे भाेसले म्हणाले दुर्देव माझे म्हणावे की परिसरात राहणा-या लाेकांचे. केवळ मला श्रेय याचे मिळेल म्हणून त्यांनी हाणून पाडलं. मला खूप वेदना झाल्या. मी तत्कालीन आमदार आणि त्यावेळेचे पालकमंत्री यांना विनंती केली. याचे संपुर्ण श्रेय तुम्ही घ्या. अत्यंत चांगली याेजना आहे आणि ती पुर्णत्वास नेली पाहिजे असं सांगितले. त्यावेळी निवडणुका झाल्या आणि सत्तांतर झाले.

त्यामुळे तुमच्यासह २२ गावातील लाेक पाण्यापासून वंचित राहावे लागले. आम्हांला हा विषय माहित हाेता. त्यामुळे पाठपूरावा करुन आम्ही सर्वांनी ताे प्रश्न मार्गी लावला. आता जलवाहिनीस टाकण्यास परवानगी मिळाली आहे. येत्या दिवाळी पर्यंत जनतेला पाणी मिळून जाईल असे सांगताना उदयनराजे म्हणाले आम्ही पाणी द्यायचं काम करताे पाजण्याचे नाही. उदयनराजेंना त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. दरम्यान हा परिसर कसा सुदंर करता येईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार उदयनराजे भाेसले udayanraje bhosale latest news यांनी केले.

आज झालेल्या विविध विकासकामांच्या भुमीपूजन आणि लाेकापर्ण साेहळ्यास सातारा शाहुपूरी पंचायत समिती सदस्य (तत्कालीन) संजय पाटील, पालिकेचे उपाध्यक्ष मनाेज शेंडे, नगरसेवक दत्ता बनकर यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी तसेच शाहूपूरी, करंजे, दाैलतनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT