Shahapur Crime News saam tv
महाराष्ट्र

Shahapur Crime News : 16 काेटींचा अपहार, आदिवासी विकास महामंडळाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांवर गुन्हा दाखल

Siddharth Latkar

- फैयाज शेख

Shahapur News : आदिवासी विकास महामंडळाच्या भात तसेच बारदान खरेदीत घाेटाळा झाल्याच्या तक्रारीवरुन पाेलिसांनी महामंडळाच्या अधिका-यांसह सहा कर्मचा-यांवर शहापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. या फिर्यादीत अधिकारी व कर्मचा-यांनी शासनाची आणि महामंडळाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. (Maharashtra News)

आदिवासी विकास महामंडळाच्या बोगस भात खरेदीत लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबन व गुन्हा दाखल करण्यात आले होते. ही घटना (shahapur) ताजी असतानाच आता पुन्हा एकदा 2022 - 2023 या वर्षात भात तसेच बारदान खरेदीत 16 कोटींचा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

याबाबतची फिर्याद सागर साेनवणे (maharashtra sahakari adivasi vikas mahamandal) यांनी दिली आहे. त्यानूसार आदिवासी विकास महामंडळातील अधिकारी, संस्थेचे सचिव, कर्मचारी अशा सहा जणांविरोधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, उपप्रादेशिक व्यवस्थापक आविनाश राठोड, विपणन निरीक्षक दिपाली सोनवणे, पळशीन आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग माढे व संस्थेचे सचिव भरत घनघाव व संगणक चालक गोकूळ राठोड यांच्यावर दाखल तक्रारीनूसार शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

SCROLL FOR NEXT