Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Shahapur News : कल्याण येथून चार दिवसांपूर्वी पळसपाडा येथील भारंगी जवळ सहा मित्रांसोबत सार्थक गणेश कोळी (वय १७) फिरण्यासाठी आला होता. मात्र अचानक तोल जावून सार्थक हा भारंगी नदीत पडला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : कल्याण येथून पळसपाडा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांमधील एकजण भारंगी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शोध कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आला नव्हता. वडिलांनी शोध पथकाच्या टीमला हात जोडून अंत्यदर्शनासाठी मुलाला शोधून देण्याची विनंती केली. यानंतर अखेर चौथ्या दिवशी मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.  

कल्याण येथून चार दिवसांपूर्वी पळसपाडा येथील भारंगी जवळ सहा मित्रांसोबत सार्थक गणेश कोळी (वय १७) फिरण्यासाठी आला होता. मात्र अचानक तोल जावून सार्थक हा भारंगी नदीत पडला. यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो बेपत्ता झाला होता. यावेळी त्याचा शोध घेण्यासाठी जीवरक्षक टिमच्या सदस्यांनी जीवाची पराकाष्ठा केली. दोन दिवस शोधकार्य राबविल्यानंतर देखील मृतदेह सापडला नव्हता. 

वडिलांची भावनिक साद 

दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर शोधकार्य थांबविण्यात आले होते. मात्र सार्थकचे वडील गणेश कोळी यांनी जीवरक्षक टिमच्या सदस्यांना विनंती केली होती, कि शेवटच्या अग्निसाठी तरी माझ्या मुलाचा मृतदेह शोधून द्या अशी भावनिक साद घातली होती. यामुळे भर पावसात जीवरक्षक टिमच्या सदस्यांनी जीवाची पराकाष्ठा करत अखेर सार्थकचा मृतदेह शोधून दिला आहे. 

आई- वडिलांचा आक्रोश 

मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. यानंतर मृतदेह शहापूर रूग्णालयाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर सार्थक त्याचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. दरम्यान मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. दरम्यान भावनिक साद घातल्याने जीवरक्षक दलाच्या टीमने मुलाचा मृतदेह शोधून दिल्याची कामगिरी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT