Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : शाळेला शिक्षक नाही; पंचायत समिती कार्यालय समोर बकऱ्या चारून विद्यार्थ्यांचे आंदोलन

Shahapur News : शहापूर तालुक्यातील बहुतांश आदिवासी गाव पाड्यात शाळा आहे. मात्र शिक्षक अपुरे असल्याने शाळेत एक शिक्षकाची नेमणूक केली आहे.

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

शहापूर : शहापूर तालुक्यात आदिवासी पदे असून येथे असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक (Teacher) नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अनेकदा मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्याने (Shahapur) आज विद्यार्थ्यांनी बकऱ्या चारत शिक्षकांची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

शहापूर तालुक्यातील बहुतांश आदिवासी गाव पाड्यात शाळा (School) आहे. मात्र शिक्षक अपुरे असल्याने शाळेत एक शिक्षकाची नेमणूक केली आहे. पहिली ते चौथी पर्यंत एकच शिक्षक शिकवतो. शाळेला एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. पण काही वेळा शिक्षकाला कामानिमित्ताने बाहेर जावे लागले, तर शाळाच  बंद असते. यामुळे (Student) विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. मुले शिक्षणात मागे राहातात.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिक्षक मिळावेत यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून शहापूर पंचायत समिती समोर बकऱ्या घेऊन जात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा भरवून आंदोलन केले. येथेच विद्यार्थ्यांनी शाळा भरविली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT