Shahapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Crime : भर दिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने घेऊन पसार; शहापूर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ

Shahapur News : शहापूर शहरातील अंबिका माता मंदिर परिसरात भर दिवसा दोन चोरटे मोटरसायकल वरून आले. या अज्ञात चोरांनी फळ विक्री करणाऱ्याच्या गळ्यातील सोन साखळी खेचून नेली आहे

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : भररस्त्यावर लूटमार होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने कोणीही आता सुरक्षित राहिलेले नाही. यात रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांना टार्गेट करत गळ्यातील चैन व मंगळसूत्र तोडून चोरटे पसार होत आहेत. अशाच प्रकारे शहापूरमध्ये भर दिवसा महिलेच्या गळ्यातील चैन तोडून चोरटे पसार झाले आहेत. सदर घटना रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

सध्या प्रत्येक तालुक्यात सोन साखळी व मंगळसुत्र चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोन साखळी व मंगळसुत्र ओढून नेत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सोनसाखळी व मंगळसुत्र गळ्यात घालून फिरणे देखील मुश्कील झाले आहे. महिलांचा सौभाग्याचा अलंकार म्हणजे मंगळसुत्र. हेच मंगळसूत्र गळ्यात घालून फिरणे महिलांच्या जीवावर बेतत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

फळ विक्रेत्याच्या गळ्यातून चैन लांबविली 
अशाच घटनेत शहापूर तालुक्यात वाढ झाली आहे. शहापूर शहरातील अंबिका माता मंदिर परिसरात भर दिवसा दोन चोरटे मोटरसायकल वरून आले. या अज्ञात चोरांनी फळ विक्री करणाऱ्याच्या गळ्यातील सोन साखळी खेचून नेली आहे. दुकानासमोर येत चोरटे सोनसाखळी चोरून नेत असल्याची घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात दोघे चोरटे स्पष्ट दिसून येत आहेत. 

नेहमी वर्दळीचा रस्ता 

दरम्यान शहापूर शहरातील अंबिका माता मंदिर परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. इतकेच नाही तर या ठिकाणी नेहमी पोलिस देखील नेहमी असतात. असे असताना देखील या परिसरातून भरदिवसा सोन साखळी चोरांनी सोनसाखळी चोरून नेली आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Bigg Boss Marathi 6 Winner: 'तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून...'; 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी कोलते झाली भावूक

Belly Fat: सकाळी या 5 सवयी करा फॉलो, पोटाचा घेर होईल आठवड्यातच कमी

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस, लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा सविस्तर

Bhendwal Bhavishyvani 2026: यंदा देशात मुसळधार पाऊस, महापूर येणार; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT