Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : घरपट्टी नावावर करण्यासाठी उपसरपंचाने मागितली लाच; ३० हजार घेताना रंगेहाथ ताब्यात

Shahapur News : गावातील उपसरपंचाला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गावातील तक्रारदार व्यक्तीचे घर आहे. मात्र त्याच्या नावावर घरपट्टी येत नव्हती घरपट्टी नावावर करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : गावातील वाद, ग्रामस्थांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच व उपसरपंच मिळून मार्ग काढत असतात. परंतु गावातील उपसरपंचाकडूनच लाच मागण्याचा प्रकार शहापूरच्या खर्डी येथे समोर आला आहे. गावातील एका व्यक्तीच्या घराची घरपट्टी नावावर करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. हि रक्कम स्वीकारताना उपसरपंचाला रंगेहाथ पकडण्यात आले. 

शहापूरच्या खर्डीचे मोसीन मृर्तुजा शेख असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या उपसरपंचाचे नाव आहे. शहापूर तालुक्यातील महत्त्वाची व लोकसंख्येने मोठी असलेली खर्डी ग्रामपंचायत समजली जाते. याच गावातील उपसरपंचाला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान गावातील तक्रारदार असलेल्या व्यक्तीचे घर आहे. मात्र त्याच्या नावावर घरपट्टी येत नव्हती. 

घरपट्टी नावावर करण्यासाठी पैशांची मागणी 

त्या अनुषन्गाने घरपट्टी नावावर करण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायत मध्ये रितसर अर्ज केला होता. मात्र ही घरपट्टी नावावर करून देण्यासाठी खर्डीचे उपसरपंच मोसीन शेख याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. जो पर्यंत पैसे देत नाही, तो पर्यंत घरपट्टी नावावर करून देणार नाही; असे म्हणून तक्रारदारास सांगत होता. उपसरपंचाकडून होत असलेल्या पैशांच्या मागणीला सदर व्यक्ती त्रासला होता. 

३० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले 

सदर व्यक्तीने या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तक्रारीची शहानिशा करत पडताळणी केली. यानंतर सापळा रचून खर्डीचे उपसरपंच मोसीन शेख यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT