Shahajibapu Patil Saam TV
महाराष्ट्र

शहाजीबापू आगामी निवडणूक लढणार नाहीत? सांगोल्यातून अभिजीत पाटलांना आमदार करण्याची मागणी

सांगोल्यातून अभिजीत पाटलांना आमदार करा, शहाजीबापूंची भलतीच मागणी; निवडणुकांआधीच मैदान सोडल्याची चर्चा

भारत नागणे

पंढरपूर: काय झाडी ,काय डोंगर फेम बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahajibapu Patil) यांनी त्यांना चक्क विधान परिषदेवर पाठविण्याची भाजप नेत्याकडे मागणी केली आहे. सांगोल्याचे दिवगंत शेकापचे नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्याकडून सतत पराभव स्विकारणारे शहाजी बापू पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे

उमेदवार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांच्या फरकाने सांगोल्यातून (Sangola) शिवसेनेकडून निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत शेकापचे आव्हान मोठे राहणार याची जाणीव झाल्यानेच आमदार शहाजी पाटील यांनी आता विधानसभे ऐवजी विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याकडे केली आहे.

पाहा व्हिडीओ -

सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्या सारखं विधान परिषदेवर पाठवा अशी जाहीर मागणी आमदार पाटील यांनी भाजप नेते दरेकर यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर (Pandharpur) येथील एका कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी ही मागणी केली. काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून पळ काढल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT