Shahaji Bapu Patil, Weight Loss saam tv news
महाराष्ट्र

Maharashtra News : चर्चा तर हाेणारच !कर्नाटकात जाताच महाराष्ट्रातील नेत्याचे घटलं वजन

उद्यापासून पुन्हा बापू सांगोला तालुक्यात येणार आहेत.

भारत नागणे

Shahaji Bapu Patil : सांगोल्याचे (sangola) शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आता नव्या रुपात लोकांसमोर आले आहेत. तब्बल सव्वाशे किलो वजन असलेल्या आमदार पाटील यांनी एका आयुवेर्दिक हाॅस्पिटलमध्ये जावून वजन कमी केले आहे. त्यांच्या नव्या रुपाची राजकीय (politics) वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हिवाळी अधिवेशनात शहाजी बापू (Shahaji Bapu Patil Latest Marathi News) हे दोन दिवस सहभागी झाले हाेते. त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपले मित्र महेश पाटील यांच्या सोबत थेट कर्नाटकामधील श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड रिसर्च हॉस्पिटल या ठिकाणी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले.

बंगळुरूमधील आश्रमातील शहाजी बापू यांचा दिनक्रम 24 डिसेंबरपासून सुरु झाला. आठ दिवस ते पहाटे पाच वाजता उठून दोन तास योगासन करणे, उकडलेल्या पालेभाज्यांचा आहार घेणे असा दिनक्रम हाेता. त्याशिवाय ध्यान, धारणा आणि व्यायाम ही केला. शनिवारी त्यांचा हा वेटलाॅस (weight loss) कोर्स पूर्ण झाला. उद्यापासून पुन्हा ते सांगोला तालुक्यातील मतदार संघात येणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हवेत भिरकावलं, चिमुकल्याला आपटलं; रिक्षाचालकाच्या विकृतीचा कळस

संतप्त गावकऱ्यांचा भोंदूबाबाला चोप, गावकऱ्यांनी कशी घडवली अद्दल? VIDEO

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

SCROLL FOR NEXT