Sexual abuse of a minor girl in the lure of marriage; Crimes filed under Pocso Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara: लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल...

Pocso Case: आरोपी युवकाने अल्पवयीन बालिकेला लग्नाचं आमिष देत 5 महिन्यांपासून नियमित अत्याचार केल्याने अल्पवयीन बालिकेला गर्भधारणा झाली.

अभिजीत घोरमारे

भंडारा: लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चप्राड येथे घडली आहे. यात बालिका गर्भवती झाली, मात्र आरोपी 18 वर्षीय युवकाने तिला लग्नास नकार दिल्याने पिडीत अल्पवयीन बालिकेच्या (Minor Girl) तक्रारीवरुन लाखांदूर पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी 18 वर्षीय युवकाविरोधात पोक्सोसह (Pocso) अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हा काल 27 मार्च रोजी लाखांदूर पोलिसांत नोंद करण्यात आला आहे. अंकुश दिवाकर हजारे वय 18 राहणार चप्राड असे घटनेतील आरोपी युवकाचे नाव आहे. (Sexual abuse of a minor girl in the lure of marriage; Crimes filed under Pocso)

हे देखील पहा -

आरोपी युवकाने काही महिन्यांपूर्वी गावातीलच एका अल्पवयीन बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण केले. यावेळी आरोपी युवकाने अल्पवयीन बालिकेला लग्नाचं आमिष देत 5 महिन्यांपासून नियमित अत्याचार केल्याने अल्पवयीन बालिकेला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्याने घटनेतील पिडीत बालिकेने आरोपीला लग्नाची गळ घातली. यावेळी आरोपीने गर्भवती अल्पवयीन बालिकेशी लग्नास नकार दिल्याने पिडीत बालिकेने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. अल्पवयीन बालिका गर्भवती झाल्याचे माहित होताच कुटुंबियांनी बालिकेसह लाखांदूर पोलिसांत धाव घेत आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन लाखांदूर पोलीसांनी आरोपी युवकाविरोधात अत्याचार आणि पोक्सोसह अट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपी युवकास अटक करण्यात आली आहे तसेच पुढील तपास लाखांदुर पोलिस करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या पाटोदा तालुक्यात अवकाळीने जांभूळ व केळी पिकांचं प्रचंड नुकसान

Suvarnadurga Fort : मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे सुवर्ण प्रतीक! सुवर्णदुर्ग किल्ल्याचे जुने नाव काय?

Diabetes Risk: या 6 सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, वेळीच व्हा सावध

Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT