Nagpur Breaking : नागपूरच्या लकडगंज परिसरातील Sex Racket चा पर्दाफाश! SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur Breaking : नागपूरच्या लकडगंज परिसरातील Sex Racket चा पर्दाफाश!

नागपूर मधील लकडगंज परिसरातील चालत असलेल्या देहव्यापाराचा नागपूर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. स्माईल युनिक सलून मध्ये आरोपी महिला स्वतःच्या फायद्यासाठी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर मधील लकडगंज परिसरातील चालत असलेल्या देहव्यापराचा (Sex Racket) चा नागपूर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. स्माईल युनिक सलून मध्ये आरोपी महिला स्वतःच्या फायद्यासाठी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला अटक करण्यात आली असून एका युवतीची सुटका करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

नागपूर (Nagpur) मधील लकडगंज परिसरात असलेल्या स्माईल युनिक सलून मध्ये चालत असलेल्या देहव्यापर पर्दाफाश करत नागपूर पोलिसाच्या (Police) गुन्हे शाखेने आरोपी महिला सपना मेश्राम ला अटक करत एका पीडित मुलीची सुटका केलेली आहे. नागपूरच्या लकडगंज भागामध्ये असलेल्या स्माईल युनिक सलून मध्ये देह व्यापार होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एक नकली ग्राहक या सलून मध्ये पाठवून तिथे देह व्यापार होतो की नाही याची शहानिशा केली आणि त्यानंतर या सलून मध्ये धाड टाकून पीडित मुलीची सुटका केली आहे.

आरोपी महिला सपना ही स्वतःच्या फायद्यासाठी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना व्यापारास प्रवृत्त करून स्माईल युनिक सलून मध्ये देह व्यापाराचा व्यवसाय चालवत होती. आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस करीत आहे. नागपुरात अश्या छोट्या छोट्या ठिकाणी देह व्यापाराचा धंदा जोरात सुरू असल्याचे होत असलेल्या कारवाई वरून दिसून येते त्यामुळे खऱ्या अर्थाने याची पाळं मुळं शोधण्याची आवश्यकता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

Maharashtra News Live Update: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू

आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

SCROLL FOR NEXT