Buldhana Accident News, samruddhi mahamarg, mehkar  Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गानजीक बस- ट्रकचा अपघात; १५ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

सर्व जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

संजय जाधव

Buldhana News : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (samruddhi mahamarg) पूलाच्या खालच्या बाजूस आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसची (msrtc bus) आणि वाळूच्या ट्रकची धडक झाली. या अपघातात (accident) बस मधील १५ प्रवासी जखमी (passengers injured) झाले आहेत. जखमीमधील ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Breaking Marathi News)

मेहकर जवळ समृद्धी महामार्गाच्या पूलाच्या खालच्या बाजूने एसटी महामंडळाची बस खामगावकडून मेहकरच्या दिशेने निघाली हाेती. या बसची वाळू वाहतुक करणा-या ट्रकशी धडक झाली. ही धडक इतकी जाेरदार हाेती की बसचा पुढचा भागाच्या काचेला तडा गेला.

हा अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवासी रस्त्याच्या कडेला बसून राहिले. यावेळी या मार्गावरुन जाणा-या नागरिकांनी जखमींना धीर दिला. या अपघातात बस मधील १५ प्रवासी जखमी झाले. या जखमींमध्ये ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्व जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT