कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा आमदारासह सात जणांवर गुन्हे दाखल संजय जाधव
महाराष्ट्र

कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा आमदारासह सात जणांवर गुन्हे दाखल

कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा आमदार आकाश फुंडकर यांसह सात जणांवर गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात महाविकास आघाडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळत असतांना कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा आमदार आकाश फुंडकर यांसह सात जणांवर गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Seven people, including a BJP MLA, have been booked for violating the Corona Rules)

हे देखील पहा -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ऍड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी खामगावच्या वतीने टॉवर चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर एकत्र जमवून तोंडाला मास्क न लावता आणि एकमेकांमध्ये सामाजिक अंतर न ठेवता बुलढाणा जिल्हा दंडाधिकारी यांच्या निर्देशित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले होते.

टॉवर चौक येथे महाविकास आघाडीचा प्रतीकात्मक गवताचा पुतळा जाळून महाविकास आघाडी सरकारचा विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला होता. दरम्यान संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने त्यास प्रतिबंधात्मक उपाय व्हावा म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी यांचे शासनाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता ब्रेक द चैन आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू केलेला होता.

मात्र असे असताना देखील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड आकाश फुंडकर भाजपा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष,संजय शिनगारे,नरेंद्र रोहणकार, पवन गरड ,रामानुज जगदीश मिश्रा, देशमुख रघुनाथ खेडकर, आणि इतर भाजपा पक्षाचे कार्यकर्ते यांनी बेकायदेशीररित्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम १८८, २६९, २७० भादवी सहकलम ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ भाजपने ठिक-ठिकाणी आंदोलनं केली होती. कोरोना प्रतिबंध असताना गर्दी जमवल्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांवर आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT