shivsena SaamTV
महाराष्ट्र

शिवसेना आमदाराने अपमान केल्याचा गंभीर आरोप; तहसीलदाराच्या लेटरबॉम्बने खळबळ

अपमान सहन होत नसल्याने मी मानसिक तणावाखाली असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मी रजेवर जात आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला- अवैध खनिजप्रकरणी कारवाई केल्याने एका आमदाराने आपल्याला दमदाटी करून आपला अपमान केल्याचा आरोप अकोल्यातील बाळापूर चे प्रभारी तहसीलदार, नायब तहसीलदार योगेश कौटकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांना लिहलेल्या लेटरबॉम्ब मुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी हे पत्र बाळापूरचे शिवसेना (Shivsena) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या विरोधात लिहीले आहे. अपमान सहन होत नसल्याने मी मानसिक तणावाखाली असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मी रजेवर जात आहे. अकोल्यातील (Akola) बाळापूरचे तहसीलदार डॉ.एल. मुकुंदे वैद्यकीय रजेवर गेल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार सुरडकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

हे देखील पहा -

दरम्यान त्यांनी महिनाभरात सदर पदभार सोडून दिला. त्यानंतर तहसीलदार पदाचा पदभार समकक्ष असणारे नायब तहसीलदार योगेश काटकर यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान नायब तहसीलदार योगेश कौटकर यांनी लिहलेल्या तक्रारीत राजकीय दबावाचा पाढा वाचला आहे. अवैध गौणखनिज उपसा करणाऱ्या आणि वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाईचा सपाटा सुरु केला. केवळ दहा- बारा दिवसांच्या कालावधीतच बाळापूरचे आमदार यांनी मला फोन करून गोपाल वडतकर या व्यक्तीच्या वाहनावर कारवाई का केली? असा दम भरला.

तसेच सदर कारवाई चुकीची असून व्यक्तीचे वाहन जप्त केल्याने दरदिवशी होणारे पाच हजार रुपयांचे नुकसान तुमच्या पगारातून वसूल करावे का? असा सवाल करत चुकीच्या कारवाया ताबडतोब बंद करा असे सांगितले. असेही तहसीलदार योगेश कौटकर यांच्या तक्रारीत लिहिले आहे. तसेच त्यांनी कार्यालयात बोलावून अपमान केल्याचा आरोप देखील केला आहे. तहसीलदार यांनी तक्रारीत आपल्याला कार्यालयात बोलावून दमदाटी करत आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT