Mumbai Police Heart Attack Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Police Heart Attack: आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्ताच्या तणावामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला हृदयविकाराचा झटका

Police Heart Attack in CM Tour: त्यांना तात्काळ बोरिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Borivali News: बोरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिनाभरापासून अनेक राजकीय नेत्यांचे दौरे झाले. यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागत आहे. याच बंदोबस्ताच्या तणावामुळे गुरुवारी सकाळी बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तात्काळ बोरिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Political News)

मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभागातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री गुरुवारी १० वाजता येणार होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत चोख बंदोबस्त तैनात करून सावंत रात्री उशिरा घरी गेले. सकाळी लवकर ड्युटीवर ते येण्यासाठी ते पुन्हा निघाले.

यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना बोरिवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र यानिमित्ताने पोलिसांच्या अतिरिक्त काम आणि आरोग्याच्या प्रश्न उभा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT