Dr. ND Patil
Dr. ND Patil Saam TV
महाराष्ट्र

जेष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती गंभीर; चार दिवसांपासून शुद्ध हरपली

संभाजी थोरात

कोल्हापूर: ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील सर यांची प्रकृती गंभीर आहे. कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात प्रा. एन डी पाटील (ND Patil) यांच्यावर उपचार सुरू आहेत. वातावरणातील बदलामुळे कणकण वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रा. एन. डी.पाटील यांनी कोरोनाची (Corona) लागण ही झाली होती, परंतु त्यातून ते सुखरुप बरे होऊन घरी आले होते. डॉ. अशोक भोपाली माहिती देताना म्हणाले, गेली अनेक दिवसांपासून प्रा.डॉ. पाटील हे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे.

सध्या 11 जानेवारी रोजी त्यांचं बोलणं बंद झालं आहे. याच दिवशी काही तपासणी करून ऍडमिट केलं गेलं होते. सध्या त्यांची शुद्ध हरपली आहे. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे कोणतेही मोठी उपचार केले नाहीत. परिस्थिती ढासळत आहे. चार दिवसापासून शुद्ध हरपली आहे. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला आहे. श्वासोच्छ्वास कमी झाला आहे. हायपोक्स झाला असल्याची माहिती उपचार करत असल्याच्या डॉक्टरांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate 14 May 2024 : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर पुन्हा घसरले; वाचा तुमच्या शहरातील प्रति तोळ्याचा भाव

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

Delhi News: ईव्हीएम आणि VVPAT प्रकरणी 'सर्वोच्च' निकालाला आव्हान! सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, काय निर्णय होणार?

Skin Care: तूपाने चेहरा उजळेल, असा करा वापर

Uttar Pradesh Accident: भरधाव कार आधी डिवाइडरला धडकली नंतर ट्रकवर आदळली; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT