satara, ajinkyatara fort, rescue operation  saam tv
महाराष्ट्र

Satara : किल्ले अजिंक्यता-याच्या दरीत ज्येष्ठ नागरिक पडला; शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम दाखल

सध्या सातारा शहरात पाऊस पडत आहे.

ओंकार कदम

Ajinkyatara Fort : सुमारे 12 तासांपासून किल्ले अजिंक्यतारा (Ajinkyatara Fort) येथून दरीत पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकास दरीतून बाहेर काढण्यासाठी सातारा (satara) शहरातील शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे सदस्य प्रयत्न करीत आहेत. हणमंत जाधव असे दरीत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. (Satara Latest Marathi News)

गेल्या दाेन दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा येथील वाट निसरडी झाली आहे. त्यामुळे नियमीत व्यायामासाठी येणारे बहुतांश नागरिक हे पायवाटेने न जाता रस्त्याने जातात.

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार हणमंत जाधव हे फिरण्यासाठी किल्ले अजिंक्यतारा येथे गेले हाेते. ते पाय घसरून दरीत पडले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ते दरीत पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. सुमारे बारा तासाहून अधिक काळ ते दरीत अडकून पडले हाेते. त्यांना शिवेंद्रराजे ट्रेकर्सची रेस्क्यू टिमकडून दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका तसेच पाेलिस दल उपस्थित आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT