Seema Shaikh, MPSC Result, Beed News saam tv
महाराष्ट्र

MPSC Success Story : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम

ग्रामीण भागामध्ये पाहिजे तेवढ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसतात. त्यातूनही अनेक विद्यार्थी यश मिळवत आहेत.

विनोद जिरे

Beed News : एमपीएससीच्या परीक्षेत बीडच्या मादळमोही गावातील सीमा शेख (seema shaikh bagged first rank in mpsc exam) या युवतीने महिला प्रवर्गातून राज्यांमध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशामुळे बीड जिल्ह्याची मान उंचावली गेली आहे. (Breaking Marathi News)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत कठीण परिश्रमाच्या जोरावर वनपरिक्षेत्र वन अधिकारी या परीक्षेमध्ये सीमा शेख (RFO Seema Shaikh) राज्यात पहिला क्रमांक मिळवत अधिकारी होण्याचं स्वप्न तिने पुर्ण केले आहे.

सीमा ही मूळची मादळमोही या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण तिने गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण तिने लातूर या ठिकाणी केले.

बीएससीतून सिमाने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दरम्यान या परिक्षेत तिने घवघवीत यश मिळवले असून जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT